देश
काळं मांजर आडवं आलं तरी प्लास्टिकबंदी होणारच, रामदास कदमांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होणारच असं म्हणत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान रामदास कदम यांच्यावर टीका करताना एखाद्याला आलेला झटका हे राज्याचं धोरण होऊ शकत नाही असं म्हटलं होतं. यावर बोलताना हे निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत होत असतात, ज्याचं नेतृत्व मुख्यमंत्र्यांकडे असतं. राज ठाकरे यांनी फक्त निवडणुका आणि पैसा दिसतो. काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होणारच असं रामदास कदम बोलले आहेत.
रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर टीका करताना काकाला पुतण्याची भीती कधीपासून वाटू लागली असा टोला लगावला होता. यावर बोलताना राज ठाकरे यांनी रामदास कदम यांनी आपले काम करावे, प्लास्टिक बंदीच्या विषयात नाती आणू नयेत. प्लास्टिक बंदीचा निर्णय हा नोटाबंदीसारखा आहे असं सुनावलं.
रामदास कदम हे इवलिशी बुद्धी असलेले नेते आहे. माझा विषय सरकारशी संबंधित आहे नात्याशी संबंधित नाही. नात्यांशी हा विषय जोडू नये आणि नात्या नात्यांमध्ये वाद कसे होतील याची अपेक्षा ठेवू नये अशा शब्दात रामदास कदम यांच्या टीकेला राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे. रामदास कदम यांनी काय केले आहे, काय करणार आहेत ते सांगावे. जेव्हा राजकारण ही गोष्ट असते तेव्हा त्याचा संबंध प्रशासनाशी असतो तेव्हा प्रशासनाने काय करायचे आहे ते त्यांनी सांगावे नाती मधे आणू नयेत. छातीवर पँट घेऊन आणि फिरून काही होत नाही. त्यांच्या शर्टचा खिसाही पँटच्या आत असतो असे म्हणत राज ठाकरेंनी त्यांची खिल्लीही उडवली. विनाकारण हा विषय दुसरीकडे घेऊन जायचा नाही असेही राज ठाकरेंनी खडसावले.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.