Menu

देश
चिप्स, कुरकुरे, बिस्कीट बनवणाऱ्या कारखान्यांना नोटीस

nobanner

प्लास्टिकबंदीनंतर आता अनेक कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. चिप्स, कुरकुरे आणि बिस्कीट पॅकिंगसाठी कव्हर तयार करणाऱ्यांना कारखान्यांना उत्पादन बंद करण्याची नोटीस आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधल्या चुन्याची डबी बनवणाऱ्या कारखान्याला उत्पादन बंद करण्याची नोटीस आली आहे. औरंगाबादच्या चिप्स, कुरकुरे आणि बिस्कीटसाठी कव्हर बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कारखान्यालाही उत्पादन बंद करण्याची नोटीस आली.

लातूरमधल्या उद्योजकांनाही आपला दोन कोटी रुपयांचा कारखाना आज बंद केला. प्लास्टिकबंदीच्या निमित्ताने सगळीकडे इन्स्पेक्टर राज आले असा आता उद्योजक आरोप करू लागले आहेत.

मोठ्या कंपन्यांचे चिप्स, बिस्किटे, कुरकुरे यांच्या व्यवसायावरती बंदी न घालता जे पूर्णपणे रिसायकल केलं जाऊ शकतं यावर बंदी का, असा उद्योजकांचा सवाल आहे.