Menu

अपराध समाचार
पतीला झाडाला बांधून त्याच्या डोळ्यादेखत पत्नीवर सामूहिक बलात्कार

nobanner

पाटणा येथे एका ३८ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या पतीसमोरच हा बलात्कार करण्यात आला. अज्ञात आरोपींनी महिलेच्या पतीला झाडाला बांधून ठेवलं होतं. गया येथील सोंधिया गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी २० जणांची चौकशी केली असून दोघांना अटक केली आहे.

हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळल्या प्रकरणी कोच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून, तपास करण्यासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आलं आहे. पीडित महिलेचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही.

पीडित महिला आपला पती आणि मुलीसोबत दुचाकीवरुन गावी परतत होते. महिलेच्या पतीचा बाहवलपूर गावात खासगी दवाखाना आहे. ‘जेव्हा आम्ही सोंधिया गावाजवळ पोहोचलो तेव्हा काही अज्ञात लोकांनी माझी दुचाकी थांबवली आणि बाजूला घेऊन गेले. त्यांनी माझ्याकडचे पैसे काढून घेतले. मला दोरीने बांधलं आणि मारहाण केली. त्यांनी माझ्या पत्नीसोबत गैरवर्तवणुकही करण्यास सुरुवात केली’, अशी माहिती पीडित महिलेच्या पतीने दिली आहे.

‘आम्हाला एक तक्रार आली होती, ज्यामध्ये पत्नीसोबत बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला. आम्ही २० जणांची चौकशी केली असून पीडित महिलेने दोघांची ओळख पटवली आहे. आम्ही इतर आरोपींचा शोध घेत आहोत ज्यांनी त्यांचे चेहरे कपड्याने झाकले होते’, अशी माहिती एसएसपी राजीव मिश्रा यांनी दिली आहे.