Menu

अपराध समाचार
पावसामुळे समोरुन येणारा टँकर न दिसल्याने दुचाकीचा अपघात, तरुणीचा मृत्यू

nobanner

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मुसळधार पावसामुळे विरुद्ध दिशेने येणारे टँकर न दिसल्याने दुचाकीस्वार तरुणीने टँकरला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून प्रियांका झेंडे (वय २२) असे या तरुणीचे नाव आहे.

लोकमान्यनगर येथे राहणारी प्रियांका झेंडे ही तरुणी शनिवारी पावसाची मजा घेण्यासाठी मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन घोडबंदर रोड येथे गेली होती. तिथून परतत असताना नागला चौकी परिसरात प्रियांकाला पावसामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरचा अंदाज आला नाही आणि ती थेट टँकर खाली सापडली. प्रियांकाच्या डोक्यावरुन टँकरचा चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रियांकाने हेल्मेट घातले नव्हते, अशी माहिती आता समोर येत आहे. पावसात वाहनचालकांनी सावध राहावे आणि दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.