अपराध समाचार
पुणे – धावत्या बसमध्ये मामे भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक
- 190 Views
- June 13, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on पुणे – धावत्या बसमध्ये मामे भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक
- Edit
धावत्या एसटीमध्ये झालेल्या हत्येने अवघा पुणे जिल्हा हादरला होता. पण कदाचित जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर ही हत्या झाली नसती. मयत श्रीनाथ खिसेच्या बहिणीने आरोपी अजित कान्हूरकर याच्या विरोधात खेड पोलिसात फेसबुकवर अश्लील फोटो आणि मजकूर टाकल्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. मात्र खेड पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं.
तक्रार केल्याचा रागातच आरोपीने चिडून फिर्यादीच्या भावाची धावत्या बसमध्ये निर्घृण हत्या करून पळ काढला. हत्येनंतर आरोपीला तात्काळ अटक व्हावी अशी मागणी करत नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्याच्या समोरच ठिय्या मांडला होता. रात्री उशिरा दावडी गावच्या शिवारात लपून बसलेल्या आरोपी अजित कान्हूरकरला पोलिसांनी शोधून काढत अटक केली आहे.
खेड पोलिसांनी अजित कान्हूरकरला आधीच अटक केली असती,तर श्रीनाथ खिसेची हत्या झाली नसती. श्रीनाथच्या बहिणीने ८ जूनला फेसबुकवर अश्लील फोटो पोस्ट केल्याप्रकरणी अजित विरोधात तक्रार दिली होती. मात्र या तपासात ए.एस.आय सावंत आणि पोलीस नाईक उबाळे यांनी हलगर्जीपणा केला. याप्रकरणी तसा अहवाल पुणे एसपींकडे पाठवण्यात आला असून त्यांच्या निर्णयावर निलंबनाची कारवाई अवलंबून आहे.
आरोपी अजित कान्हूरकरने मामे भाऊ श्रीनाथ खिसे वय-१७ याची धावत्या एसटीत प्रवाशांसमोरच भरदिवसा हत्या केली होती. श्रीनाथच्या बहिणीशी अजितचे प्रेमसंबंध होते, तिच्याशी त्याला लग्न करायचं होतं. पुण्यात वेगवेगळ्या महाविद्यालयात इंजिनियंरिंगचे शिक्षण घेणाऱ्या या दोघांच्या भेटीगाठी ही सुरू होत्या. मात्र खिसे कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. मग अजितने श्रीनाथच्या बहिणीचे अश्लील फोटो अन खासगी मजकूर फेसबुकवर पोस्ट केला आणि इथूनच वादात भर पडली.
श्रीनाथच्या बहिणीने याप्रकरणी आठ जूनला खेड पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर अजितचा चांगलाच पारा चढला. मंगळवार रोजी सकाळी फेसबुकवर “माफ कर दो भाईलोग, बहुत तडफा हु. मेरी तरफ से भी सोच लो, उसको भी तडपणा चाहीये.” असा मजकूर टाकला. सकाळी सात वाजता दावडी येथून अजित आणि श्रीनाथ एकाच बसमध्ये बसले. बस थोडी पुढे जाताच अजितने पाठीमागून कोयत्याने सपासप वार करून श्रीनाथची निर्घुण हत्या केली. वेळीच खेड पोलिसांनी आरोपीला अटक केली असती तर हा मोठा अनर्थ टळला असता. गांभीर्य लक्षात न घेता बघ्याची भूमिका घेणाऱ्या खेड पोलिस कर्मचार्यांवर कारवाई होणार का हा देखील प्रश्न आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.