Menu

मनोरंजन
बोल्ड अॅंण्ड ब्युटीफुल सई ताम्हणकर@32

nobanner

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल गर्ल सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. सई 32 वर्षांची झाली आहे. सईचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीत झाला. सईने अनेक चित्रपटातून वर्सेटाईल भूमिका केल्या. मराठी सोबतच हिंदी चित्रपटातही सईने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

मूळची सांगलीची असलेल्या सईने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेने सईने अभिनयाची सुरुवात केली. ‘अनुबंध’, ‘अग्निशिखा’, ‘तुझं माझं जमेना’, ‘साथी रे’ या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.

‘सनई चौघडे’ हा सईचा पहिला चित्रपट. या चित्रपटाने तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले.

मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ख्याती काही नवीन नाही. ती तिच्या ‘नो एण्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटामुळेच. यातील बिकिनी सीनमुळेच सई बरीच चर्चेत आली.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी चित्रपटाने सईला वेगळी ओळख मिळवून दिली. याच चित्रपटातील स्वप्निल जोशीसोबतच्या केमस्ट्रिने सईने अनेक चाहत्यांची मने जिंकली.

‘हंटर’मध्ये सई आपल्याला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. तर ‘दुनियादारी’, ‘बालक पालक’, ‘टाईम प्लीज’, ‘तू ही रे’, ‘वजनदार’, ‘वायझेड’, ‘क्लासमेट्स’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.