अपराध समाचार
‘कंडोम’मुळे ३० वर्षांनंतर बलात्कारी पोहोचला तुरूंगात, पोलिसांचं यश
- 256 Views
- July 17, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ‘कंडोम’मुळे ३० वर्षांनंतर बलात्कारी पोहोचला तुरूंगात, पोलिसांचं यश
- Edit
१९८८ साली अमेरिकेमध्ये एका लहानग्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. निर्घुण हत्येमुळे ही घटना त्यावेळी बरीच चर्चेत होती. मात्र, अखेर ३० वर्षांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपी जॉन मिलर याला अटक केली आहे. विशेष म्हणजे कंडोमच्या तपासणीनंतर मिळवलेल्या डीएनएच्या आधारे ३० वर्षांनंतर ५९ वर्षांच्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात अमेरिका पोलीस यशस्वी ठरले. इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या तपासानंतर कंडोमद्वारे मिळालेलं पोलिसांचं हे यश हैराण करणारं आहे.
ही घटना घडली त्यावेळी लहानगी केवळ आठ वर्षांची होती. फोर्ट वायने येथील घराजवळ मुलीचा मृतदेह आढळला होता. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, घटनेच्या काही वर्षांनंतर आरोपीच्या काही कृत्यांमुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला होता. वर्ष २००४ मध्ये त्याच्या घराजवळून वापरण्यात आलेले काही कंडोम जमा करण्यात आले. त्यावरुन पोलिसांनी डीएनए मिळवले आणि त्याचा नमुना चिमुकलीच्या कपड्यांवरुन मिळालेल्या डीएनएसोबत मॅच करण्यात आला. त्यानंतर जॉन मिलर अथवा त्याच्यासोबत राहणाऱ्या त्याच्या भावावर पोलिसांनी संशय व्यक्त केला. वृत्तानुसार जॉन मिलरने वापरलेले तीन कंडोम चिमुकलीच्या डीएनए प्रोफाइलशी मॅच झाले. न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत. न्यायालयात सुनावणीदरम्यान चिमुकलीचे कुटुंबिय भावुक झाले होते. चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या झाली त्यानंतर पोलिसांनी तिचे अंतर्वस्त्र ताब्यात घेऊन डीएनए घेतले होते.