Menu

देश
ठाण्यात आंदोलकांनी माजीवाडा पुलावर टायर जाळले

nobanner

9:50 मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मनमाडहून सुटणाऱ्या बस बंद, प्रवाशांचे हाल.

9:47 सातारा- चिपळूण – विजापूर राज्य मार्गावर कराडजवळ ओगलेवाडी येथे टायर पेटवून मराठा समाजाचे आंदोलन. वाहतूक ठप्प

9:45 ठाण्यात आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले. माजीवाडा पुलावर हे टायर जाळल्याने वाहतूक थांबली आहे.

9:40 मराठा आंदोलकांकडून ठाण्यात दुकानं बंद

9:33 मुलुंडच्या बाजारपेठा मराठा कार्यकर्त्यांनी केल्या बंद

9:25 जोगेश्वरीला चर्चगेटकडे जाणारी फास्ट लोकल मराठा आंदोलकांनी रोखली.