देश
मध्य रेल्वेची कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प
nobanner
मध्ये रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विठ्ठलावाडी जवळ रुळावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. रेल्वे स्थानकांवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. बदलापूरमध्ये देखील रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सकाळपासूनच येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे याचा फटका रेल्वेला बसला आहे.
लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांना ही याचा फटका बसला आहे. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन तर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गावरुन पळवण्यात आली आहे. ठाणे, वसई-विरार आणि रायगड या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.
Share this: