देश
महाराष्ट्रात राजकीय भूकंप : पाच आमदारांचा राजीनामा
आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक अधिकाधिक आक्रमक होताना दिसताहेत. या आंदोलनाला घेऊन आता राजनितीदेखील सुरू झालीयं. कॉंग्रेस, एनसीपी आणि शिवसेना या प्रकरणी सत्तेत असलेल्या भाजपावर निशाणा साधतेय. भाजपाच्या गोटातही या प्रकरणाला घेऊन अंतर्गत वादळ उफाळलंय. महाराष्ट्रातील पाच आमदारांनी राजीनामा दिलाय. टाईम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभेतील भरत भाल्के (कॉंग्रेस), राहुल अहेर (भाजपा) आणि दत्तात्रेय भारणे (राकांपा) यांनी गुरूवारी आमदार पदाचा राजीनामा दिलाय. याआधी बुधवारी हर्षवर्धन जाधव (शिवसेना) आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राकंपा) यांनीही आरक्षण मागणी समर्थनार्थ राजीनामा समोर ठेवला. जाधव यांनी गुरूवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात आपले राजीनामा पत्र पाठवलेयं.
नवी रणनिती ?
मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करण्यासाठी काय रणनिती आखायची तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात पेटलेलं वातावरण कसं शांत करता येईल यावर मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आत्महत्येनंतर वातावरण पेटलं
काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने, मराठा आरक्षणासाठी नदीत उडी मारली, यात काकासाहेब यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यात दुसऱ्या दिवशी याच्या निषेधार्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पुकारण्यात आला, यानंतर आणखी तिसऱ्या दिवशी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतही बंद पुकारण्यात आला. या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या, तर काही ठिकाणी एसटी बसंचही नुकसान झालं.