देश
मालवाहतूकदार आजपासून संपावर
एकीकडे राज्यातील दूध आंदोलनमागे घेतले जात असतानाच संपूर्ण देशात आज, शुक्रवारपासून मालवाहतूकदार बेमुदत संपावर गेले आहेत. देशभरातील तीन हजारांहून अधिक संघटना त्यात सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
इंधन दरांची सातत्याने होणारी वाढ, टोलदरातून सवलत आदी विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे आज पहाटे सहा वाजल्यापासून संपाची झळ सुरू झाली आहे. या संपात मालवाहतूकदार, लग्झरी, साध्या तसेच एसी बसेसचाही समावेश आहे. स्कूल बसचाही या संपात समावेश असल्याने मुंबईसह राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. या संपातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
मागण्या मान्य न झाल्याने संपाचे हत्यार
देशात इंधनदर वाढत गेल्याने वाहतूक क्षेत्रातील दरही चढे झाले आहेत. मालवाहतूक, खासगी बसक्षेत्रावर त्याचा परिणाम होत असल्याने मालवाहतूकदारांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे वारंवार केलेल्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने संपाचे हत्यार हाती घ्यावे लागले, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे समन्वयक बालमल्कीत सिंह यांनी सांगितले.
सरकारकडे मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असला तरीही त्यातून कोणताही तोडगा निघत नसल्याची सल मालवाहतूकदारांमध्ये होती. त्यातून मार्ग निघत नसल्याने संघटनेने देशव्यापी संपाचा इशारा दिला होता. त्यानंतरही सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केले आहे, असे बालमल्कीत सिंह यांनी सांगितले.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.