देश
मुंबईतील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
nobanner
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुुरु आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गावर वाहतूक उशिराने धावत आहे.
राज्यातील प्रत्येक ठिकाणचे लाईव्ह अपडेट.
– पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने
– मुंबई आणि परिसरातील शाळांना सुट्टी घोषित. पाऊस वाढल्याने शिक्षण विभागाने जाहीर केली सुट्टी. कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
– नवी मुंबईत पावसाची संतत धार सुरू, सखल भागात साचले पाणी
– सायन-पनवेल मार्गावर कामोठे येथे पाणी साचल, वाहतूक धीम्या गतीने
– कळवा स्टेशनवर पाणी भरल्याने अप मार्गावरील धीमी लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आली. मुंब्रा, कळवा स्टेशनवर धीमी लोकल थांबणार नाही.
– अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागात संततधार सुरू
Share this: