देश
मुंबईत आणखी एका पुलाजवळ रस्त्याला तडे
nobanner
ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणाऱ्या पुलाजवळ रस्त्याला तडे गेल्याचं समोर आलंय. त्यामुळे या पूलावरील वाहतूक थांबवण्यात आली असून, ही वाहतूक केनेडी ब्रीजवरून वळवण्यात आलीय रस्त्याची आणि पूलाची पहाणी करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.
पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर
दरम्यान, पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर आलीय. अंधेरी रेल्वे रुळावर गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातानंतर मंगळवारी बांद्रा ते गोरेगाव दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. आता रेल्वे वाहतूक पूर्ववत झालीय. जलद पाठोपाठ चर्चगेट-अंधेरी दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झालीय. सुरक्षेचा उपाय म्हणून अंधेरी दरम्यान रेल्वे धिम्या गतीने चालवण्यात येत असल्याने आजही मुंबईकरांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
Share this: