अपराध समाचार
मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने दलित तरुणाची हत्या
- 242 Views
- July 25, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने दलित तरुणाची हत्या
- Edit
राजस्थानमधील बारमेर येथे मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने एका दलित तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेतराम भीम असं २२ वर्षीय तरुणाचं नाव होतं. खेतराम हा मेहबूब खान यांच्या घरी काम करायचा. त्यांच्या घरातील तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते.
दोघांना एकत्र पाहिल्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी त्याला चेतावणी दिली होती. यावेळी कुटुंबातील काहीजणांनी त्याच्या हत्येचा कट आखला असा आरोप खेतरामचा भाऊ हरिराम याने केला आहे.
शुक्रवारी सदाम खान आणि हरियत खान यांनी खेतरामला शेतात बोलावलं. तिथे आधीच काहीजण त्याची वाट पाहत थांबले होते. खेतराम पोहोचल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. हात बांधून जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत मारहाण करण्यात आली. मृत्यू झाल्यानंतर मृतदेह काही अंतरावर फेकून देण्यात आला अशी माहिती हरिरामने दिली आहे. तीन दिवसांनंतर मृतदेह हाती लागला.
शवविच्छेदन अहवालानुसार, खेतरामला अत्यंत बेदम मारहाण करण्यात आली. तसंच त्याचा गळाही दाबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून इतरांची नावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.