खेल
लोकेश राहुलची हनुमान उडी! टी-२० क्रमवारीत पटकावलं तिसरं स्थान
भारताच्या लोकेश राहुलने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. लोकेश राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीत तिसरं स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचने पहिलं तर पाकिस्तानच्या फखार झमानने दुसरं स्थान आपल्या नावावर केलं आहे. झिम्बाब्वेत पार पडलेली तिरंगी टी-२० मालिका, भारत-इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या टी-२० मालिकेनंतर आयसीसीने नव्याने आपली क्रमवारी जाहीर केली आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात लोकेश राहुलने शतकी खेळी केली होती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात लोकेश राहुलला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नसल्यामुळे त्याला ८१२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मात्र आपल्या याआधीच्या कामगिरीत सुधारणा करत लोकेश राहुलने क्रमवारीत ९ स्थान वर झेप घेतली आहे.
आयसीसीची नवीन टी-२० क्रमवारी पुढील प्रमाणे असेल –
१) अॅरोन फिंच – ८९१ गुण
२) फखार झमान – ८४२ गुण
३) लोकेश राहुल – ८१२ गुण
४) कॉलिन मुनरो – ८०१ गुण
५) बाबर आझम – ७६५ गुण
६) ग्लेन मॅक्सवेल – ७६१ गुण
७) एविन लुईस – ७५३ गुण
८) मार्टीन गप्टील – ७४७ गुण
९) अॅलेक्स हेल्स – ७१० गुण
१०) डार्सी शॉर्ट – ६९० गुण