अपराध समाचार
२ वर्षांच्या मुलीला विकण्याच्या तयारीत असलेल्या आईला ४० वर्षांचा तुरुंगवास
- 219 Views
- July 16, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on २ वर्षांच्या मुलीला विकण्याच्या तयारीत असलेल्या आईला ४० वर्षांचा तुरुंगवास
- Edit
२ वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी विकण्याच्या तयारीत आईला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १२०० डॉलर्समध्ये आपल्या पोटच्या मुलीची विक्री ही बाई करणार होती अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील टेक्सास या राज्यात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. www.rt.com ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
बाल-तस्करी आणि विक्री संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन टेक्सासमध्ये राबवण्यात आले. या दरम्यान एक आईच आपल्या मुलीला विकण्याच्या तयारीत होती असे समजले आहे. साराह पीटर्स असे या महिलेचे नाव आहे. तिला कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी कोर्टाने तिला या प्रकरणी ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. साराह पीटर्सने आपल्या दोन वर्षांच्या मुलीची ऑनलाइन विक्री करण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठी तिने १२०० डॉलर्सची किंमतीही लावली होती.
बाल तस्करी किंवा विक्रीबाबत टेक्सासमध्ये काय सुरु आहे याची पडताळणी सरकारतर्फे करण्यात येत होती. त्यात वेबसाईटवर अशा काही जाहिराती आहेत का? हे शोधत असताना पोलिसांना साराह पीटर्सचा डेटा मिळाला त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आणि कोर्टापुढे हजर केले. यानंतर कोर्टाने साराह पीटर्सला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.