देश
दोन डाव, दोन भोपळे – सलामीवीर मुरली विजयच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजीची दैना सुरुच आहे. त्यातही सलामीवीरांकडून होणारी निराशाजनक कामगिरी हा भारतासाठी मोठा चिंतेचा विषय ठरली आहे. लॉर्ड्स कसोटीत भारताचा सलामीवीर मुरली विजयच्या नावावर चौथ्या दिवसाच्या खेळात नकोशा विक्रमाची नोंद झालेली आहे. मुरली विजय कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात दोनदा शून्यावर बाद होणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही डावांमध्ये मुरली विजयला अँडरसननेच माघारी धाडलं आहे.
चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत इंग्लंडने ३९६/७ या धावसंख्येपर्यंत मजल मारली. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सॅम करन मोहम्मद शमीकडे झेल देत माघारी परतला, यानंतर लगेचच इंग्लंडचा कर्णधार जो रुटने डाव घोषित केला. पहिल्या डावात इंग्लंडने २८९ धावांची आघाडी घेतली. ख्रिस वोक्स आणि जॉनी बेअरस्टोमध्ये झालेली शतकी भागीदारी आणि यानंतर सॅम करनने वोक्ससोबत केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. ख्रिस वोक्सने या सामन्यात नाबाद १३७ धावांची खेळी केली. बेअरस्टोने ९३ धावा केल्या. हा कसोटी सामना अनिर्णित राखायचा असल्यास उरलेल्या दिवसाच्या खेळात संयमीपणे फलंदाजी करणं भारतीय फलंदाजांसाठी क्रमप्राप्त झालेलं आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.