देश
परेलच्या ‘क्रिस्टल टॉवर’ला भीषण आग
nobanner
मुंबईत परेल भागातील क्रिस्टल टॉवर या इमारतीला भीषण आगीनं घेरल्याचं वृत्त हाती येतंय. ‘क्रिस्टल टॉवर’ ही सोळा मजल्यांची रहिवासी इमारत आहे. त्यातील बाराव्या मजल्यावर आग लागल्याचं समजतंय. आगीचं वृत्त हाती येताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. डॉ. आंबेडकर रोडला लागून ही इमारत आहे.
या इमारतीत अनेक जण अडकून पडल्याचं समजतंय. टॉवरच्या बाराव्या मजल्यावरून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसत आहेत. इमारतीत अडकलेले नागरिक गॅलरीत येऊन मदतीसाठी याचना करत आहेत.
आग पसरल्यामुळे लिफ्ट बंद करण्यात आली आहे. जिन्यांवरही धूर पसरला आहे. खालचे मजले तातडीनं रिकामे करण्यात आलेत. अग्निशमन दलाचे जवान वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आग पसरू नये याची काळजी घेतली जातेय.
या इमारतीतील अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Share this: