Menu

देश
फटका गँगच्या ‘त्या’ गुन्हेगाराला अटक

nobanner

धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावल्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. याची रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेत त्या फटका गँगच्या गुन्हेगाराला अटक केली आहे. एका मुलाने धावत्या लोकलमधून प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याची बातमी लोकसत्ता.कॉमने सीसीटीव्ही फुटेजसह दिली होती. या बातमीची दखल घेत मध्य रेल्वेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे.

धावत्या लोकलच्या दारात लटकू नका असं आवाहन रेल्वेकडून सातत्याने केलं जातं. मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा रेल्वे मार्गादरम्यान कळवा स्थानकावर एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे. हा संपूर्ण थरारक प्रकार कळवा स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला. त्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

धावत्या लोकलमधून मोबाइल टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं समोर आलं आहे. १९ ऑगस्ट रोजी कळवा स्टेशनवर धावत्या लोकलमधून मोबइल खेचलेला व्हिडीओ समोर आला होता. रात्रीच्या १२:५३ मिनीटाच्या कल्याणकडे जाणाऱ्या गाडीमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले होते. या घटनेत चेतन अहिरराव या प्रवाशाला जीव गमवावा लागला.

नाशिकमध्ये राहणारा चेतन १९ ऑगस्ट रोजी ठाण्यातल्या मित्राच्या वाढदिवसासाठी दिवा इथल्या आपल्या नातेवाईकांकडे आला होता. १९ ऑगस्टला मित्राचा वाढदिवस साजरा करुन, चेतन ठाण्याहून दिव्याला लोकलनं परतत होता. मध्यरात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी कळवा रेल्वे स्थानकात आरोपीने चेतनच्या हातातील मोबाइलवर फटका मारला. मोबाईल हिसकवल्याचे लक्षात येताच चेतनने धावत्या लोकलमधून कल्याणच्या दिशेला फलाट संपल्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

कळवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील हा प्रकार आहे. प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका मुलाने धावत्या लोकलमधून प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील तरुणाने दरवाज्यात उभ्या असेल्या प्रवाशाचा मोबइल खेचला. त्यानंतर त्या प्रवाशाने लगेच ट्रेनमधून उडी मारल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.