Menu

खेल
भारताला पंचम स्थानी बढती!

nobanner

म्पियन्स चषकात भारताने रौप्यपदक पटकावण्याची केलेली चमकदार कामगिरी भारतीय पुरुष हॉकी संघाच्या पथ्यावर पडली आहे. संघाच्या जागतिक क्रमवारीत एका क्रमाने बढती होऊन भारतीय संघाला पाचवे स्थान देण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने मंगळवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत हे जाहीर करण्यात आले. चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियन संघाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये हार पत्करावी लागली होती. निर्धारित वेळेत तो सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. मात्र शूटआऊटमध्ये भारताला फटका बसला. दरम्यान प्रारंभीच्या दहा संघांपैकी एकमेव भारताच्या संघालाच बढती मिळाली आहे. भारताच्या खालोखाल जर्मनी, इंग्लंड, स्पेन, न्यूझीलंड आणि आर्यलड यांचा समावेश आहे. तर आशियातील अन्य देशांपैकी मलेशिया बाराव्या स्थानी तर पाकिस्तान तेराव्या आणि कोरिया चौदाव्या स्थानावर आहे.

महिला नवव्या स्थानावर

महिला हॉकी संघानेदेखील जागतिक क्रमवारीत एका स्थानाने प्रगती साधली आहे. त्यांना आता नववे स्थान प्राप्त झाले असून भारतीय महिला सध्या आशियात सर्वोच्च स्थानी आहेत. भारतानंतर कोरिया दहाव्या स्थानी, चीन अकराव्या तर जपानला चौदावे स्थान देण्यात आले आहे.

महिलांमध्ये नेदरलॅँडच्या संघाने अव्वल स्थान कायम राखले आहे. तर त्यापाठोपाठ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेटिना आणि जर्मनीचे स्थान आहे. विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारलेल्या आर्यलडच्या संघाने सर्वाधिक आठ स्थानांची उडी मारत थेट आठवे स्थान गाठले आहे.

पुरुष जागतिक क्रमवारी

१. ऑस्ट्रेलिया (१९०६ गुण)

२. अर्जेटिना (१८८३ गुण)

३. बेल्जियम (१७०९ गुण)

४. नेदरलॅँड (१६५४ गुण)

५. भारत (१४८४ गुण)

६. जर्मनी (१४३७ गुण)

७. इंग्लंड (१३७९ गुण)

८. स्पेन (१३२८ गुण)