Menu

खेल
महिला हॉकी संघाला सुवर्णपदकाची संधी

nobanner

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई स्पर्धा आता आपल्या अखेरच्या सत्रात आलेल्या आहेत. पहिल्या १२ दिवसांच्या खेळांमध्ये भारताने पदकांची पन्नाशी ओलांडलेली असून; नेमबाज, कुस्तीपटू, अॅथलेटिक्समध्ये भारताने पदकांची लयलूट केली आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भारताला पदकाने हुलकावणी दिली आहे. कबड्डीत भारताला इराणकडून पराभव स्विकारावा लागला, तर हॉकीत मलेशियाने भारतावर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. आजच्या दिवसाच्या खेळात महिला हॉकी संघाला सुवर्णपदक जिंकण्याची चांगली संधी आलेली आहे. याव्यतिरीक्त भारतीय बॉक्सिंगपटूंकडूनही आज पदकांची अपेक्षा आहे. आजच्या दिवसाच्या खेळाचे लाईव्ह अपडेट तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात.