देश
मुंबई पोलिसांची जबरदस्त कामगिरी, रेल्वे स्थानकातून पळवलेल्या ४ महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका
मुंबईतील ओशिवरा व आंबोली पोलिसांनी जबदरदस्त कारवाई करत अपहरण झालेल्या चार महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका केली. १७ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे रेल्वे स्थानकातून चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. प्रकरणाचा छडा लावत पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पथकासमक्ष बाळाला ओशिवरा पोलिसांनी मातेच्या ताब्यात दिले आहे.
२२ ऑगस्ट २०१८ रोजी बकरी ईदनिमित्त मुंबईत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्त दरम्यान सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक (बक्कल नं. ६०४) दुधाड, हवालदार (बक्कल नं. १२९८८) पवार, महिला पोलीस हवालदार (बक्कल नं. ४८३) गावनग हे पथक पोलीस मोबाइल व्हॅन क्र. ५ मधून गस्त घालत होते. यावेळी वर्षा पवार नावाच्या २० वर्षीय तरुणीने त्यांना एका महिलेने पुणे रेल्वे स्थानकातून चार महिन्यांचे बाळ पळवले असल्याची माहिती दिली. सदर माहिती मिळताच मोबाइल व्हॅनमधील पोलीस पथकाने तात्काळ बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल येथे धाव घेऊन महिलेला ताब्यात घेतले. मात्र सदर महिला व तिची साथीदार महिला ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने दोन्ही महिलांना चार महिन्यांच्या बाळासह आंबोली पोलिसांनी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, ओशिवरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शर्मिला पाटील व पोलीस उपनिरीक्षक मोटे यांनी महिलेची कसून चौकशी केली असता तिने स्वत:चे नाव मनीषा महेश काळे असे सांगितले. १७ ऑगस्ट २०१८ रोजी एका महिलेची नजर चुकवून तिच्या चार महिन्यांच्या बाळाला पळवल्याची कबुली मनिषाने दिली. यानंतर तात्काळ पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. यावेली चार महिन्यांच्या बाळाचे अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ८८८/१८) भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
माहिती मिळातच पुणे लोहमार्ग पोलीस महिलेला घेऊन ताबडतोब पुण्याहून मुंबईला येण्यास निघाले. कागदोपत्री पूर्तता करून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार, पोलीस निरीक्षक कुरिल यांच्या मार्गदर्शनाखाली ४ महिन्यांच्या बाळाला मातेच्या ताब्यात देण्यात आले, तर मनीषा काळे हिला पुणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.