अपराध समाचार
व्हॉटस अपॅ ग्रुपमधून काढल्यामुळे अॅडमिनवर रोखली बंदूक
- 292 Views
- August 30, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on व्हॉटस अपॅ ग्रुपमधून काढल्यामुळे अॅडमिनवर रोखली बंदूक
- Edit
सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. यातही व्हॉटस अॅपचा वापर सर्वाधिक होताना दिसतो. व्हॉटसअॅपवरच्या सगळ्याच ग्रुपमध्ये आपण तितकेच अॅक्टीव्ह असतो असे नाही पण बऱ्याच ग्रुपमध्ये आपला सहभाग असतो. अशाच एका ग्रुपमधून अॅडमिनने बाहेर काढल्याचा राग मनात ठेऊन एका व्यक्तीने अॅडमिनवर थेट बंदूक उगारली. त्यानंतर अॅडमिनच्या बाजूने असलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. मग गावातील लोकांनी यामध्ये मध्यस्थी करत ही भांडणे मिटवली. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
मिल्क लच्छी गावातील तरुणांचा विद्यार्थी निवडणूकांच्या संदर्भातील गोष्टींसाठी एक व्हॉटसअॅप ग्रुप करण्यात आला होता. यामध्ये असलेला एक युवक अभ्यास करत नव्हता. त्यामुळे अॅडमिनने या तरुणाला ग्रुपमधून काढून टाकले. या तरुणाने आपल्याला ग्रुपमधून काढल्यामुळे अॅडमिनला फोन करुन बऱ्याच शिव्या दिल्या. आपल्याला पुन्हा ग्रुपमध्ये घेण्यात यावे असेही त्याने सांगितले. मात्र तरीही अॅडमिनने त्याला ग्रुपमध्ये न घेतल्याने त्याने चिडून या अॅडमिनवर बंदूक रोखली. त्यावेळी अॅडमिनच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.
यावेळी दोन्ही बाजूला तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील ज्येष्ठांनी यामध्ये लक्ष घालत भांडणे मिटवत तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ग्रुपमधून काढण्यात आलेल्या मुलाने पोलिसांकडे मारहाण केल्याची तक्रार केली आहे. आता या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून त्यावर चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल.