अपराध समाचार
शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा, तरूणीला घेऊन गेला फार्महाऊसवर
- 242 Views
- August 21, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा, तरूणीला घेऊन गेला फार्महाऊसवर
- Edit
नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव भगत असे त्यांचे नाव आहे. १९ वर्षीय तरूणींने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नामदेव भगत हे नवी मुंबईतील नेरुळमधून शिवसेनेचे नगरसेवक आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत सध्या स्थायी समिती सदस्य आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी सिडको संचालकपदही सांभाळलं होतं.
फार्म हाऊसवर नेऊन नामदेव भगत यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप 19 वर्षीय तरुणीने केला आहे. नामदेव भगत यांची कामानिमित्त भेट घेण्यासाठी आपण उरण तालुक्यात असलेल्या दिघोडेमधील फार्म हाऊसवर गेलो होतो. मात्र तिथे गेल्यावर त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप 19 वर्षीय तक्रारदार तरुणीने केला आहे. पोलिसांनी नामदेव भगत यांच्याविरोधात कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.