Menu

देश
2002 Godhra Train Carnage: दोघांना जन्मठेप, तिघांची सुटका

nobanner

विशेष न्यायालयानं 2002मधल्या गोध्रा ट्रेन हत्याकांडप्रकरणी आणखी दोन जणांना दोषी ठरवलं आहे तर तीन जणांची मुक्तता केली आहे. 2002मध्ये कारसेवकांचा समावेश असलेल्या साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली होती त्यावेळी 72 कारसेवक ठार झाले होते. त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीचे व्रण अद्यापही मिटलेले नाहीत. 2015-16 मध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी पाच जणांना गोध्रा हत्याकांडाप्रकरणी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयासमोर सुनावणी झाली आणि तीन जणांची मुक्तता करण्यात आली तर दोघांना दोषी धरण्यात आले.