देश
आंबेनळी अपघाताची पुनरावृत्ती… बस दरीत कोसळून 45 जण ठार
काही आठवड्यांपूर्वी झालेल्या आंबेनळी घाटातील बस अपघाताची पुनरावृत्ती आज तेलंगणामध्ये पाहायला मिळालीय. तेलंगणात झालेल्या बस अपघातात 45 जणांचा जागीच मृत्यू झालाय… तर तब्बल 65 जण जखमी झालेत. तेलंगणाच्या जगितयाल जिल्ह्यातील कोंडागट्टूजवळ राज्य परिवहनची बस दरीत कोसळून हा अपघात झालाय. मंगळवारी दुपारी हा अपघात झालाय.
कोंडागट्टू हनुमान मंदिर या भागातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केलीय.
उल्लेखनीय म्हणजे, या अपघातानं जुलै महिन्यात महाराष्ट्रातील आंबेनळी अपघाताच्या आठवणी जाग्या केल्या. दापोली येथून महाबळेश्वरला निघालेल्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला होता. या भयंकर दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर केवळ एक प्रवासी सुदैवी ठरला होता.