अपराध समाचार
कर्जमाफी मिळत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या
- 282 Views
- September 07, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on कर्जमाफी मिळत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या
- Edit
कर्जमाफी मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घराशेजारील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. रमेश सावळे आणि विद्या सावळे असे या दाम्पत्याचे नाव आहे.
मोताळा येथे राहणारे शेतकरी रमेश सावळे आणि विद्या सावळे या दाम्पत्यावर कर्ज होते. राज्य सरकारकडून कर्जमाफी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ सावळे दाम्पत्याला मिळाला नव्हता. त्यांचे कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांचा यादीत नावही होते. मात्र, कर्जमाफी झाले नव्हते. बँकेचे कर्ज डोक्यावर असल्याने ते दाम्पत्य तणावात होते. कर्जमाफी नाही आणि त्यामुळे नव्याने कर्जही मिळत नव्हते. या विवंचनेतून गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सावळे दाम्पत्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या दाम्पयाला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. गावात त्यांची ३ एकर शेती होती.