Menu

देश
…तर भाजपानेही मतांची भीक मागू नये, जावडेकरांवर वाचक संतापले

nobanner

सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. मात्र या वक्तव्यानंतर अनेक स्तरांमधून त्यांच्यावर टिका होताना दिसत आहे. लोकसत्ताने घेतलेल्या फेसबुक आणि ट्विटर पोलमध्येने हजारो वाचकांना जावडेकरांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

पुण्यात जनप्रबोधिनीनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना काही शाळा सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येतात आणि आर्थिक मदत मागतात. ते खरंतर माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागू शकतात. आपल्या शाळेला वा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे असं वादग्रस्त मत जावडेकर यांनी व्यक्त केलं होतं.

फेसबुक आणि ट्विटवर लोकसत्ताने #LoksattaPoll हा हॅशटॅगअंतर्गत ‘सरकारकडे शाळांनी भिक न मागता माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक मदत मागावी हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं मत पटतं का?’ हा प्रश्न विचारला. अवघ्या आठ तासांमध्ये या पोलमध्ये हजारो वाचाकांनी आपले मत नोंदवले.

फेसबुकवरील पोलमध्ये १५ सप्टेंबर (संध्याकाळी सहा वाजेपर्यंत) २ हजार ९०० हून अधिक लोकांनी मत नोंदवले आहे. यापैकी २ हजार ४०० हून अधिक म्हणजेच ७५ टक्के वाचकांनी नकारात्मक उत्तर देत जावडेकरांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. दुसरीकडे ५०० हून अधिक वाचकांनी जावडेकर यांचे मत बरोबर असल्याचे मत व्यक्त करत होकार्थक उत्तर देत त्यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले आहे.

ट्विटवरही या पोलला अवघ्या आठ तासांमध्ये ९०० हून अधिक वाचाकांनी प्रतिसाद दिला आहे. १५ सप्टेंबर (संध्याकाळी सहा वाजेपर्यंत) ९३३ वाचकांनी आपले मत नोंदवले असून त्यापैकी ८१ टक्के लोकांनी जावडेकरांचे विधान पटले नसल्याचे सांगितले आहे. तर १९ टक्के वाचकांनी जावडेकरांचे मत योग्य असल्याचे मत मांडले आहे.

फेसबुक आणि ट्विटवर या पोलवर वाचकांनी आपल्या सविस्तर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी जावडेकरचे हे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे तर काहीजणांनी जावडेकर काहीच चुकीचं बोलले नसून आपल्या शाळेला मदत करणे हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे.

पाहूयात काही वाचकांच्या प्रतिक्रिया

एकंदरीतच जावडेकरांचे हे मत वाचकांना पटलेले दिसत नसून अनेकांनी प्रतिक्रियांमधून आपला संताप व्यक्त केला आहे. तुम्हीही लोकसत्ताच्या या पोलमध्ये उद्या म्हणजेच १६ सप्टेंबर सकाळी १० वाजेपर्यंत आपले मत पोल तसेच कमेन्टच्या माध्यमातून नोंदवू शकता.