Menu

देश
नमो लाट कायम! ४८ टक्के लोकांचा मोदींना पाठिंबा, प्रशांत किशोर यांच्या संस्थेचे सर्वेक्षण

nobanner

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास कायम असून देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम नेता म्हणून ४८ टक्के लोकांनी मोदींनाच पसंती दर्शवली आहे. प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय- पॅक) या संस्थेच्या ऑनलाइन सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीने ५५ दिवसांत ७१२ जिल्ह्यांमधील ५७ लाख लोकांचे मत जाणून घेतले. ऑनलाइन सर्वेक्षणाच्या माध्यमातून हे मत जाणून घेण्यात आले. यात लोकांना ९२३ नेत्यांचा पर्याय उपलब्ध होता. यात देशाला पुढे नेण्याची क्षमता असलेला नेता म्हणून लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारड्यात मत टाकले. तब्बल ४८ टक्के लोकांनी मोदींना मत दिले आहे. राहुल गांधी ११ टक्के मतांसह दुसऱ्या तर अरविंद केजरीवाल ९.३ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे सात टक्के मतांसह चौथ्या स्थानी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ४.२ टक्के मतांसह पाचव्या आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती ३.१ टक्के मतांसह सहाव्या स्थानी आहेत.

महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या समस्या, आर्थिक विषमता, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, जातीय सलोखा हे देशातील प्रमुख मुद्दे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सर्वेक्षणात मोदी आघाडीवर असून राहुल गांधींपेक्षा तीन पट जास्त मते मोदींना मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी हा अहवाल चिंता वाढवणारा ठरु शकतो. पण या अहवालावर अनेकांनी आक्षेप घेतला. हे ऑनलाइन सर्वेक्षण असून यात ग्रामीण भागातील जनतेचे मत समजू शकलेले नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

अक्षय कुमार, महेंद्रसिंह धोनीने राजकारणात यावे
सर्वेक्षणात क्रीडा, मनोरंजन किंवा अन्य क्षेत्रांमधील कोणत्या मंडळींनी राजकारणात यावे, असे वाटते असा प्रश्न होता. यात अक्षय कुमार, महेंद्रसिंह धोनी आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावांना लक्षणीय पाठिंबा मिळाला.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.