अपराध समाचार
पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलताना नवऱ्याने केली आत्महत्या
- 244 Views
- September 18, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलताना नवऱ्याने केली आत्महत्या
- Edit
nobanner
पत्नीसोबत लाईव्ह व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशात इंदूरमधील एरोड्रम भागात रविवारी रात्री ही घटना घडली. रणजीत (३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक वादामुळे पत्नी तिच्या माहेरी बिहारला निघून गेल्यामुळे रणजीत खचला होता.
रविवारी रात्री पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. रणजीत त्याच्या कुटुंबासोबत लक्ष्मणपूरा कॉलनीमध्ये रहायचा. पेशाने तो ड्रायव्हर होता. आत्महत्या करण्यापूर्वी रणजीतने त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला होता.
पोलिसांनी हा मोबाइल फोन ताब्यात घेतला आहे. रणजीतची पत्नी आणि अन्य नातेवाईक मंगळवार दुपारपर्यंत इंदूरमध्ये दाखल होतील अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
Share this: