Menu

अपराध समाचार
रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी सैन्यातील जवान

nobanner

हरयाणातील रेवाडी येथील १९ वर्षांच्या तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आरोपी हा सैन्यातील जवान असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी भारतीय सैन्याशी संपर्क साधला आहे. तर या प्रकरणात सैन्याचा जवान सहभागी असेल तर आम्ही त्याला पाठिशी घालणार नाही, असे सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रेवाडी बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित तरुणी ही सीबीएसई टॉपर असून कोचिंग क्लासला जात असताना नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तरुणी सीबीएसईमध्ये २०१५ रोजी हरयाणा विभागात पहिली आली होती. २६ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला होता. सध्या ती पुढील शिक्षण घेत होती.

रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी हा सैन्यातील जवान असून तो सध्या राजस्थानमध्ये तैनात असल्याची माहिती उघड झाली आहे. आरोपींचा शोध सुरु असून प्रमुख आरोपी लष्करी जवान असल्याने पोलिसांनी आता सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये देण्याची घोषणाही हरयाणा सरकारने केली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला आहे.

लेफ्टनंट जनरल चेरिश मॅथसन यांनी देखील या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘रेवाडी प्रकरणात जर सैन्यातील जवान सामील असेल तर आम्ही त्याला पाठिशी घालणार नाही’, असे त्यांनी सांगितले.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.