Menu

देश
सामाजिक संदेशाचा गणेशोत्सव

nobanner

नवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक देखावे

आधुनिकता आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यांतून पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या देखाव्यांतून सामाजिक संदेश दिला आहे.

नेरुळमधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती मंडळाचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. महाराष्ट्र पोलीस आणि खाकी वर्दीतला खरा हिरो असा आशय घेतला आहे. खाकी वर्दीच्या आत एक माणूसही लपलेला असतो. २४ तास सुरक्षा देणाऱ्या या रक्षकांमध्ये आणि नागरिकांमध्ये दरी वाढत चालली आहे. त्यामुळे पोलिसाचा एक माणूस म्हणून विचार करण्याची गरज असल्याचा संदेश देखाव्यांतून दिला आहे. यासाठी चलचित्र आणि चित्रफितींचा वापर करण्यात आला आहे.

सीवूड्स रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन सीवूड्स पश्चिम गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यात यंदा प्लास्टिकविरोधी संदेश देण्यात आला आहे. यासाठी रिडय़ूस, रियुज, रिसायकल या तत्त्वावर देखावा साकारलेला आहे.

शिवआधार चॅरिटेबल ट्रस्ट ,शिवाजीनगर नेरुळ या संस्थेतील सदस्यांनी यंदा अनोखा गणेशोत्सव साजरा केला. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अभ्यासकेंद्रातील विद्यर्थ्यांंनी नेरुळ एलपी जंक्शन येथे पदपथावरील एका झाडालाच श्रीगणेशाचे रुप दिले.कोणत्याही प्रकारची इजा न करता झाडालाच मुकुट, हार व पितांबर लावून गणपती बनवले. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या संस्थेने दिला आहे