Menu

देश
स्टिव्ह स्मिथ अडकला लग्नाच्या बेडीत

nobanner

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेदरम्यान बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ अखेर लग्नाच्या बेडीत अडकलेला आहे. स्मिथ आपली गर्लफ्रेंड डॅनी विलीससोबत शनिवारी एका छोटेखानी सोहळ्यात विवाहबद्ध झाला. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन स्मिथने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितलेली आहे.

बॉल टॅम्परिंग प्रकरणात वर्षभराची शिक्षा भोगत असलेल्या स्मिथने प्रसारमाध्यमांपुढे येऊन आपली चूक कबुल केली होती. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने स्मिथला काही स्थानिक टी-२० स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली. मात्र ऑस्ट्रेलियातील कोणत्याही स्पर्धेत स्मिथ आता खेळू शकणार नाहीये. त्यामुळे लग्नानंतर स्मिथ क्रिकेटच्या मैदानावर कधी पुनरागमन करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.