खेल
हर्षा भोगले, संजय मांजरेकरांना समालोचकांच्या यादीतून वगळलं
nobanner
१५ सप्टेंबरपासून युएईत पार पडल्या जाणाऱ्या आशिया चषकासाठी समालोचकांची यादी आशियाई क्रिकेट परिषदेने जाहीर केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे समालोचनात नावाजलेलं नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षा भागले यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये. याचसोबत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनाही या यादीमध्ये स्थान मिळवता आलेलं नाहीये.
आशिया चषकासाठी यांच्यावर असेल समालोचनाची जबाबदारी –
भारत – सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (लक्ष्मण उपलब्ध होत नसल्यास झहीर खान)
पाकिस्तान – रमिझ राजा, आमिर सोहेल
श्रीलंका – कुमार संगकारा, रसेल अर्नोल्ड
बांगलादेश – अथर अली खान
पाहुणे समालोचक – डीन जोन्स, ब्रेट ली, केविन पिटरसन
Share this: