Menu

टेक्नोलॉजी
एलजीचा 5 कॅमेरा असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स

nobanner

एलजी इलेक्ट्रोनिक्सने गुरुवारी पाच कॅमेरा असलेला नवा वी 40 थिंक स्मार्टफोन लॉंच केला. पाच कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूस मुख्य तीन तर पुढच्या बाजूस दोन कॅमेरा असणार आहेत. ज्या कॅमेराची ग्राहकांना गरज आहे असेच कॅमेरा यामध्ये असल्याचे एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष हवांग जियोंग हवान यांनी सांगितलं.

दमदार बॅटरी
या कॅमेरातून उत्तम गुणवत्तेचे पिक्चर्स मिळू शकणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. एलजी वी 40 मध्ये गुगल असिस्टेंटसाठी एक वेगळं बटण असणार आहे. यासोबतच पॉवर बॅकअपसाठी 3,300 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वायरलेस चार्जरलाही सपोर्ट करणारी आहे.

फिचर्स
एलजीवी 40 थिंक वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी आणि 4 एलटीई असे फिचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अॅण्ड्रॉइड 8.1 ओर ओरियोवर काम करतो. एलजी वी 40 थिंकमध्ये 6.4 इंच क्यूओडी एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले दिला गेलायं. याचं रिझॉल्यूशन 3120*1440 पिक्सल आहे. याचा एस्पेक्ट रेश्यो 19*5.9 इतका आहे.

मेमरी
यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 एसओएससोबतच 6 जीबी रॅम आणि 64 जीबी, 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यासोबत मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने याला दोन टेराबाइट पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. एलजी वी 40 थिंक ग्रे, लाल, निळ्या रंगात उपलब्ध आहे. याच्या किंमतीबाबत अद्याप माहीती समोर आली नाही.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.