Menu

देश
कफ परेडमध्ये पाण्याची टंचाई; श्रीमंतांवर टँकर मागवण्याची वेळ

nobanner

शहरातील उच्चभ्रू आणि हायप्रोफाईल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कफ परेडमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. रतन टाटा, अनिल अंबानी, सायरस मिस्त्री यांच्यासह अनेक उद्योगपतींच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून पालिकेचे पाणी आलेच नाही.

कफ परेड, कुलाबा, फोर्ट या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पाणीच आलेले नाही. तर गेल्या दोन महिन्यांपासून या भागात ३० ते ४० टक्केच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे कुलाबा, कफ परेडमधील सामान्य लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.