देश
कांदिवलीत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी
nobanner
कांदिवली पश्चिमेला मिलाप पेट्रोल पंपावर शनिवारी सकाळी रिक्षामध्ये गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन रिक्षा चालक जखमी झाले असून त्यांना तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रिक्षामध्ये गॅस ओव्हरलोड झाल्यामुळे हा स्फोट झाला. दोघांची हालत नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या स्फोटात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. २० मिनिटे रिक्षा चालक एकाच जागेवर पडून होता. अनिल शिवराम मोरे (५७) , सोहेल कमाल अहमद शेख (५७), शैलेश कृपाशंकर तिवारी (२५) हे तिघे जखमी झाले आहेत.
Share this: