Menu

देश
मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने

nobanner

मध्य रेल्वेवर कळवा स्थानकाजवळ रेल्वे फाटकामुळे लोकल गाड्यांची वाहतूक उशिराने सुरु आहे. रेल्वे फाटक दीर्घकाळ खुले राहिल्याने धीम्या मार्गावरील लोकल गाड्या विलंबाने धावत आहेत.

रेल्वे फाटकामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीत वेळोवेळी खंड पडत असल्याचे दिसून येत असून बुधवारी सकाळी कळवा येथील रेल्वे फाटक यासाठी कारणीभूत ठरले. बुधवारी सकाळी कळव्यातील रेल्वे फाटक दीर्घ काळ खुले ठेवावे लागले आणि याचा फटका लोकल गाड्यांना बसला. यामुळे धीम्या मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

कळवा खारेगाव नाक्यावरील रेल्वे फाटकातून रुळ ओलांडताना होणारे अपघात आणि रेल्वे वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.