देश
रेणुका शहाणे म्हणतेय, माझ्याजवळ देखील #MeToo ची कहाणी…पण….
हॉलीवूडपासून पसरलेली #MeToo चळवळ भारतात अनेकांची पोलखोल करत आहे. या #MeToo नावाच्या वादळात बॉलीवूडमध्ये समजल्या जाणाऱ्या बड्या बड्या नौका हेलकावे खाऊ लागल्या आहेत. या दरम्यान अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील आपल्याकडे #MeToo ची कहाणी असल्याचं म्हटलं आहे, तसेच जगात अशी एखादीच महिला असेल जिच्याकडे #MeToo ची कहाणी नसेल. रेणुका शहाणे असं म्हणतात, की माझ्यासोबत चुकीचं वागणारा कुणी मोठा प्रसिद्ध व्यक्ती नव्हता.
रेणुका शहाणे त्यांच्यासोबत झालेल्या #MeToo विषयी म्हणतात, मला वाटतं अशी एकही महिला नसेल, जिच्यासोबत #MeToo सारखी घटना घडली नसेल. माझ्या कहाणीत कुणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हता.
हे अनेक वर्षांपूर्वी झालं, पण त्या घटनेनं मी प्रभावित झाले, या घटनेने माझा जग पाहण्याचा दृष्टीकोन बदलवून टाकला, प्रभावित केला.
न्यूज एजंसी भाषाला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी हे सांगितलं आहे. मी आयुष्यभर लोकलट्रेन आणि सार्वजनिक बसमध्ये प्रवास केला.
प्रवासादरम्यान अनेक वेळा तुम्हाला कुणीतरी स्पर्श करून, धक्का लावून, स्तन दाबून निघून जातो, किंवा तत्सम असं काहीतरी.
त्याच्यासाठी हा फरक पडत नाही की, तुमचं वय किती आहे, तुमचं लग्न झालं आहे किंवा नाही, तुम्ही गर्भवती आहात किंवा नाही. ही कधी न संपणारी यादी आहे.
रेणुका शहाणे सतत सामाजिक विषयांवर आपलं मत व्यक्त करीत आहेत. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर शोषणाचा आरोप केल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी #MeToo ची कहाणी जगासमोर मांडली आहे.
अलोक नाथ, साजिद खान, सुभाष घई, कैलाश खेर, रजत कपूर यांच्यासारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींवर #MeToo चा तर काहींवर बलात्काराचा आरोप देखील झाला आहे.
बॉलीवूडने अलोक नाथचे पराक्रम लपवले?
रेणुका शहाणे यांनी म्हटलं आहे की, चित्रपट उद्योगात लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं नाही, अशी महिला मी भाग्यवानच समजेल.
माझ्याकडे देखील असे प्रस्ताव आले होते, पण मी कडक शब्दात नकार दिल्यानंतर, माझ्या भावनांचा विचार करण्यात आला. माझ्यासोबत असं झालं होतं.
रेणुका शहाणे म्हणतात, अलोक नाथचं घातक वागणं, चित्रपट सृष्टीने वाईटपद्धतीने लपवलं. अलोक नाथवर संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी आणि दीपिका अमीन यांनी आरोप केले आहेत.
रेणुका शहाणे म्हणतात, आलोक नाथ सोबत मी राजश्री प्रॉडक्शनचा सिनेमा ‘हम आपके है कौन’ आणि दूरदर्शनवरील मालिका इम्तिहान मध्ये काम केलं होतं, त्यावेळेसच मला त्यांच्या अशा वागण्याविषयी कानावर आलं होतं.
एका ठिकाणी छापून देखील आलं होतं की, अभिनेत्री नवनीत निशानने आलोक नाथच्या कानाखाली आवाज काढला होता.
रेणुका शहाणेने असं देखील सांगितलं, आणि हे सर्वांना माहित आहे, अलोक नाथ जेव्हा दारूच्या नशेत असत, तेव्हा ते जरा वेगळेच वागत.
मला पार्टी करणे आवडत नव्हतं, म्हणून मला असा कोणताही अनुभव आला नाही, असं देखील रेणुका शहाणे यांनी म्हटलं आहे. तसेच राजश्री प्रॉडक्शनच्या सेटवर याविषयी फारच कडक वातावरण आणि शिस्त होती.