Menu

देश
संघाच्या स्वयंसेवकांनी देशाच्या भविष्याच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा: सत्यर्थी

nobanner

याचक किंवा आलोचक होऊन आपण देशसेवा करु शकत नाही. संवेदनशील, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि सुरक्षित भारत निर्माण करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी यांनी व्यक्त केले. आपण आणखी किती दिवस उदासीनता, तटस्थता आणि भीतीच्या सावटाखाली वावरणार आहोत, असा सवाल त्यांनी विचारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी देशाच्या वर्तमान आणि भविष्याच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.