देश
सेक्सला विरोध केल्याने तरुणीने मुलाच्या गुप्तांगाला दिले चटके
सेक्सला विरोध केल्याने तरुणीने १३ वर्षाच्या मुलावर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमधील ग्रेटर नोएडा येथे ही घटना घडली आहे. तरुणीने मुलाला घरात कोंडून ठेवलं होतं. सेक्ससाठी नकार दिल्यानंतर तरुणीने गरम चिमट्याने मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
पीडित मुलाच्या आईने तरुणीचं लग्न झालं होतं अशी माहिती दिली आहे. शरिरसंबंध ठेवण्यासाठी ती वारंवार प्रयत्न करत असे असंही त्यांनी सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तरुणी जवळपास २० वर्षांची होती. शुक्रवारी जेव्हा ती घरी एकटी होती तेव्हा तिने मुलाला अमिष दाखवत आपल्या घरी नेलं’. मंगळवारी मुलाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाला गंभीर इजा पोहोचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपहरण आणि धमकावल्याचाही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महिलेविरोधात पॉस्को अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सध्या तपास करत असून यामध्ये अजून काही बाजू आहे का याची चाचपणी केली जात आहे. पोलिसांनी तपासात उशीर केला असल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.