Menu

देश
#MeToo: एम.जे. अकबरांचा खटला लढण्यासाठी ९७ वकिलांची फौज

nobanner

लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी आपल्या कायदेशीर बचावासाठी वकिलांची मोठी फौजच उभी केली आहे. नुकताच त्यांनी आपल्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकारांविरुद्ध मानहानीचा घटना दाखल केला होता. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आणि हेतुपरत्वे करण्यात आल्याचे अकबर यांनी सांगितले होते.

एम.जे. अकबर यांच्याविरुद्ध सर्वप्रथम पत्रकार प्रिया रमाणी यांनी आवाज उठवला होता. अकबर यांचा खटला लढवणाऱ्या करंजवाला अँण्ड कंपनी लॉ फर्मने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. करंजवाला अँण्ड कंपनी लॉ फर्मने न्यायालयात सादर केलेल्या वकीलपत्रात ९७ वकिलांची नावे आहेत. त्यापैकी सहा वकील सातत्याने अकबर यांच्या खटल्यावर लक्ष ठेवून असतील.

अकबर यांच्यावर एकूण नऊ महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हापासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला होता. मात्र, एम.जे. अकबर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असे भाजपचे म्हणणे होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करू, असे आश्वासनही दिले होते.