अपराध समाचार
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग
- 243 Views
- November 05, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग
- Edit
nobanner
मोरीवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी भीषण आग लागली असून या आगीमुळे परिसरात धूराचे लोट पसरले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रेशिया केमिकल्स असे या कंपनीचे नाव असून आग लागताच कंपनीतील सर्व कामगार वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार १३ कामगार कंपनीत काम करत होते.
Share this: