Menu

देश
केदारनाथाच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक

nobanner

उत्तराखंडच्या हर्षिल या ठिकाणी असलेल्या सीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहचले. तिथे केदारनाथाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी दर्शन घेतले. पंतप्रधान झाल्यापासून ते तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिरात आले आहेत. केदारनाथावर जलाभिषेक केल्यानंतर त्यांनी पूजा-अर्चाही केली तसेच मंदिराला प्रदक्षिणाही मारली. केदारनाथमध्ये पुनर्निमाणाचे काम कसे सुरु आहे याचा ते स्वतः आढावा घेत आहेत. काही अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली.

केदारनाथ मंदिराचे दृश्य सध्या अत्यंत विहंगम असे दिसून येते आहे. मंदिरामागे असलेल्या डोंगरांवर बर्फाची दुलईच पसरली आहे. केदारनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून ही सजावट अत्यंत उठून दिसते आहे. केदारनाथाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड प्रलयावर काढण्यात आलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही पाहिले. काही वेळाने केदारनाथ भागाच्या पुनर्निर्माणाचे प्रेझेंटेशनही पाहणार आहेत. केदारनाथमध्ये पंतप्रधान आल्याचे समजताच अनेकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना हात हलवून अभिवादन केले.

याधी दोनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे. २०१७ मध्ये दोनवेळा त्यांनी भेट दिली. आता ते पुन्हा एकदा केदारनाथ मंदिरात आले. २०१३ मध्ये झालेल्या महाप्रलयात केदारनाथ मंदिर आणि परिसराची दुरवस्था झाली होती.