देश
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
nobanner
शहाड – कल्याण स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. मुंबईकडे येणाऱ्या मेल- एक्स्प्रेस तसेच लोकल गाड्यांचा खोळंबा झाला असून ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.
शहाड – कल्याण स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळी रेल्वे रुळाला तडे गेले. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्या विलंबाने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने मंगळवारी सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मनस्तापाचा सामना करावा लागला.
Share this: