देश
मुनगंटीवारांचे वाघांची शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांशी साटेलोटे
अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन काँग्रेसने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुनगंटीवार हे प्राण्यांच्या हत्येसाठी ओळखले जातात. ते शिकार करणाऱ्या माफियांच्या टोळीत सामील असावेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
अवनी वाघिणीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले. राज्यात भाजपाचे सरकार येताच २०१५ मध्ये चौदा वाघांचा मृत्यू झाला. तर २०१६ मध्ये १६ आणि २०१७ मध्ये तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाला. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा. पण वाघांना ठार मारल्याच्या घटना पाहता सुधीर मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे त्यांनी सांगितले. जय वाघ अजूनही बेपत्ता असून ही साधी गोष्ट नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.