देश
‘मुस्लिमांच्या लांगुलचालनासाठीच टिपू सुलतान जयंतीचा घाट’
टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आम्हाला कोणालाच स्वारस्य नाही. जनतेपैकीही कोणाचा असा आग्रह नाही. मात्र कर्नाटक सरकारला मुस्लिमांच्या लांगुलचालनासाठी टिपू सुलतान जयंती साजरी करायची आहे असा आरोप कर्नाटक भाजपाचे प्रमुख बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. फक्त मुस्लिम मतं मिळवण्यासाठी राज्यात टिपू सुलतान जयंतीचा घाट घालण्यात आला आहे. खरंतर ही जयंती साजरी केलीच जाऊ नये कर्नाटक सरकारने त्यावर बंदी आणली पाहिजे मात्र तसे केले तर त्यांना मुस्लिम समाजाची मतं कशी मिळतील? असाही प्रश्न येडियुरप्पा यांनी विचारला आहे.
गेल्या वर्षीही टिपू सुलतान जयंतीवरून राजकारण तापले होते. एवढेच नाही तर या वर्षी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या मुद्यावरून कर्नाटक सरकारवर टीका केली होती. ज्या महापुरुषांपासून प्रेरणा घेतली जाईल अशा महापुरुषांची जयंती साजरी गेली पाहिजे पण तसे कर्नाटक सरकारला वाटत नाही असे म्हणत त्यांनी सरकारचे कान टोचले होते. आता पु्न्हा एकदा टिपू सुलतान जयंतीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत.