Menu

देश
राणीच्या बागेत प्राण्यांच्या पिंजऱ्यात राहणार मुंबईचे महापौर; राज ठाकरेंचे ‘फटकारे’

nobanner

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याच्या निर्णयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला फटकारले आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्र ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात राणीच्या बागेत प्राण्यांच्या पिंजऱ्यात मुंबईच्या महापौरांना दाखवण्यात आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा नुकतीच स्मारक ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आली. तर मुंबईच्या महापौरांना भायखळा येथील जिजामाता उद्यानात पर्यायी निवासस्थान दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी ट्विटरवर व्यंगचित्र पोस्ट केले असून या व्यंगचित्रातून त्यांनी शिवसेनेला फटकारले आहे. राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची चिन्हे असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.