Menu

देश
शिवसैनिकांच्या अयोध्या दौऱ्याचा रेल्वे प्रवाशांना ताप

nobanner

ठाणे स्थानकात गर्दी, घोषणाबाजी; वाट अडल्याने विलंब

राम मंदिराच्या मागणीसाठी अयोध्या दौऱ्यावर निघालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी ठाणे स्थानकात केलेले शक्तिप्रदर्शन ठाणेकर प्रवाशांसाठी तापदायक ठरले. ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील अनेक शिवसैनिक ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर जमले होते. त्यांनी ऐन गर्दीच्या वेळी फलाट आणि पुलांवर ठाण मांडून घोषणाबाजी केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला ‘चलो अयोध्या’ अशी हाक दिल्यानंतर ठाणे शहरात शिवसेनेने मोठी फलकबाजी करीत गेल्या काही दिवसांपासून वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला. ठाण्याहून शिवसेनेचा पहिले पथक गुरुवारी रवाना झाले. घोडबंदर, बाळकुम तसेच पालघर येथून मोठय़ा संख्येने शिवसैनिक ठाणे स्थानकात सकाळी ११ पासून जमले. फलाटावर जागा नसल्याने कार्यकर्त्यांनी पूलही व्यापला. १२ नंतर सर्वसामान्यांना चालणेदेखील कठीण झाले. फलाट दोनवरील जिन्याकडे जाणारा मार्गही त्यांनी अडवला. दुपारी १.४० ची विशेष कामायनी एक्स्प्रेस पकडण्यासाठी कार्यकर्त्यांचा लोंढा फलाट सातवर उतरला. महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होत्या. गाडी निघण्यासाठी विलंब झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

ठाणे स्थानकातून अयोध्येला जाण्यासाठी विशेष एक्स्प्रेस सुटणार होती. ठाण्यातील १८०० कार्यकर्ते जमल्यामुळे गर्दी झाली होती. एरवीही गर्दी असते. गर्दीचा कुणालाही त्रास झाला नाही. आमच्याकडे तक्रार आली नाही.