देश
अंतिम फेरीची घटिका आली समीप!
लोकसत्ता लोकांकिकाच्या पुणे विभागीय अंतिम फेरीची घटिका आता समीप आली आहे. मंगळवारी (११ डिसेंबर) भरत नाटय़ मंदिर येथे अंतिम फेरी रंगणार असून, सहा एकांकिकांमधून सवरेत्कृष्ट एकांकिकेची मुंबईतील महाअंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.
सृजनशील विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्यासाठी लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा सुरू झाली. विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळणाऱ्या या स्पर्धेने आता राज्यभरात नावलौकिक मिळवला आहे. पुणे विभागीय अंतिम फेरीत सहा एकांकिका सादर होणार असून, त्यातील एका एकांकिकेला महाअंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल.
वैविध्यपूर्ण विषय, विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक केलेली मांडणी हे एकांकिकांचे वैशिष्टय़ आहे. आता अंतिम फेरीत सहाही एकांकिकाचे सादरीकरण कशा पद्धतीने होते हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल.
विनामूल्य प्रवेशिकांसाठी..
अंतिम फेरीच्या विनामूल्य प्रवेशिका लोकसत्ता, एक्स्प्रेस हाउस, प्लॉट नं. १२०५/२/६, संभाजी बागेसमोर, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर येथे उपलब्ध आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या प्रवेशिका दिल्या जातील. अंतिम फेरीच्या दिवशी, ११ डिसेंबरला दुपारी साडेतीननंतर भरत नाटय़ मंदिर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेशिका दिल्या जाणार आहेत.
प्रायोजक
सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टुर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका-२०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टीमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर म्हणून तर एबीपी माझा न्यूज पार्टनर आहेत.
अंतिम फेरीसाठी निवड झालेले संघ
फग्र्युसन महाविद्यालय (आशा), बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (दोन पंथी), आबासाहेब गरवारे महाविद्यालय (अंधार), मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय (अफसाना), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेरीटेल), स. प. महाविद्यालय (बातमी क्रमांक एक करोड एक)
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.